केंद्रीय आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आज नवीदिल्लीत राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य तसंच मुख्य सचिवांची बैठक झाली. कफ सिरपच्या गुणवत्तेवर आणि तर्कसंगत वापरावर या उच्चस्तरीय बैठकीत चर्चा झाली. सर्व औषध उत्पादकांनी सुधारित शेड्युल ‘एम’ चं काटेकोर पालन करणं आवश्यक असल्याचं आरोग्य सचिवांनी या बैठकीत अधोरेखित केले. नियमांचे पालन न करणाऱ्या युनिट्सचे परवाने रद्द करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.
राज्यांना विशेषतः मुलांमध्ये कफ सिरपचा तर्कसंगत वापर करायचं आवाहन करण्यात आलं आहे.