केंद्र सरकारच्या निकषांमुळे कापसाला योग्य भाव मिळत नसल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. एकीकडे राज्यातला कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी आमदारांना पाच कोटी रुपयांचा निधी दिला गेला आहे असं म्हणत, सरकारकडे शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत का असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. राज्यातल्या आदिवासी आणि मागासवर्गीय विभागांचा निधी वळवला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मनसेच्या महाविकास आघाडीतल्या समावेशाबद्दल वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल असं त्यांनी यासंदर्भातल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.