अमरावतीत दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत भारतीय कपास निगमतर्फे यंदाच्या हंगामातल्या कापूस खरेदीला आज प्रारंभ झाला. या टप्प्यात १० ते १५ कापूस गाड्यांची आवक बाजार समितीत झाली आहे. यंदा ८ टक्के आर्द्रता असलेल्या कापसाला ८ हजार १० रुपये प्रतिक्विंटल तर १२ टक्के आर्द्रता असलेल्या कापसाला ७ हजार ६८९ रुपये प्रतिक्विंटल इतका दर जाहीर करण्यात आला.
Site Admin | November 11, 2025 3:11 PM | cotton
दर्यापूर कृषी बाजार समितीत कापूस खरेदीला प्रारंभ