विदर्भात, विशेषतः अमरावती जिल्ह्यात, स्थानिक बाजारात मागणी वाढल्यानं सरकीच्या दरात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे कापसाचे दरही सव्वा ते साडे सात हजार रुपयांवर पोहोचले आहेत.
सरकीचे दर पूर्वी ३ हाजर ३०० रुपये क्विंटल होते ते गेल्या दोन दिवसात ३ हजार ७५० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. रुईच्या दरात मात्र वाढ झालेली नाही.
रुपयाच्या तुलनेत डॉलरची दरवाढ, चीनच्या तयार कपड्यांवर अमेरिकेनं वाढविलेला कर, यासह अन्य बाबींमुळे देशांतर्गत कापसाचे दर टिकून असल्याचं व्यापारी सूत्रांनी सांगितलं.