August 14, 2025 3:56 PM | costal road

printer

मुंबई किनारी रस्ता उद्यापासून २४ तास खुला राहणार

मुंबईचा किनारी रस्ता उद्यापासून २४ तास वाहतुकीसाठी खुला असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. मुंबई किनारी रस्त्यावरचं विहार क्षेत्र आणि चार पादचारी भुयारी मार्गाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. वाहतुकीच्या नियमांचं पालन करून या रस्त्याचा वापर करावा, असं आवाहन त्यांनी केलं. आज लोकार्पण केलेले प्रकल्प हे फक्त काँक्रीट, स्टील आणि तंत्रज्ञानाची कमाल नसून मुंबईच्या भविष्याची गती, गुणवत्ता आणि सुरक्षिततेची हमी आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यामुळे मुंबईचं वाहतुकीचं जाळं आणखी सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईत सध्या सुरू असलेले प्रकल्प गेमचेंजर असून यामुळे मुंबईच्या रस्त्यांवरची वाहतूक कोंडी बऱ्याच प्रमाणात कमी होईल आणि मुंबईकरांचा प्रवास सुखकर, तसंच पर्यावरणपूरक होईल, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.