डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 8, 2024 2:33 PM | drauadi murmu

printer

भ्रष्टाचार हा असा आजार आहे जो मुळापासून नष्ट झाला पाहिजे- राष्ट्रपती

भ्रष्टाचार हा असा आजार आहे जो मुळापासून नष्ट झाला पाहिजे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्या आज केंद्रीय दक्षता आयोगाच्या दक्षता जागरूकता सप्ताह २०२४ निमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.

 

डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम, ई मार्केटप्लेस आणि इकॉनॉमिक ऑफेंडर्स ॲक्ट यासारखी अनेक पावलं भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरकारनं उचलली असल्याचं त्या म्हणाल्या. तक्रारींचा जलद निपटारा व्हावा, यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्याचं केंद्रीय दक्षता आयुक्तांनी यावेळी सांगितलं.