देशातल्या प्रमुख आठ उद्योगांच्या एकत्रित निर्देशांकात गेल्या महिन्यात ३ पूर्णांक ७ दशांश टक्के वाढ झाली. यात सिमेंट उत्पादनात साडेतेरा टक्के, पोलाद ६ पूर्णांक ९ दशांश, वीज ५ पूर्णांक ३ दशांश, खतं ४ पूर्णांक १ दशांश, आणि कोळसा उत्पादनात ३ पूर्णांक ६ दशांश टक्के वाढ नोंदवली गेल्याचं वाणिज्य आणि उद्याग मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे.
मात्र, कच्च्या तेलाच्या उत्पादनात ५ पूर्णांक ६ दशांश, नैसर्गिक वायू ४ पूर्णांक ४ दशांश, तर पेट्रोलियम शुद्धिकरण प्रकल्पांच्या उत्पादनात १ टक्के घसरण झाली आहे.
एप्रील ते डिसेंबर दरम्यान या उद्योगांचा वृद्धी दर साधारणतः २ पूर्णांक ६ दशांश टक्के असल्याचं या आकडेवारीत दिसतं.