डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील’

राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात झालेल्या आढावा बैठकीत दिली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जिल्हा विकास सोसायटीच्या आर्थिक सक्षमतेच्या दृष्टीनं प्रस्ताव सादर करावेत, पात्र शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज वाटप करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश वळसे पाटील यांनी प्रशासकांना यावेळी दिले. या बैठकीला आमदार प्रविण दरेकर, आणि संबंधित विभागाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.