आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्यांच्या ब्रॅण्डची विक्री आणि वाटपाबाबतच्या नियमात कोणतेही बदल केलेले नसून या गोळ्या डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय यापुढेही मिळणार आहेत, असं स्पष्टीकरण सरकारनं दिलं आहे. शेड्युल एच आणि के मध्ये समावेश असणाऱ्या हार्मोनल म्हणजेच संप्रेरक गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीसाठी डॉक्टरांची चिठ्ठी लागण्याबाबतचे नियम बदलण्याच्या प्रस्तावाचा काही प्रसार माध्यमं चुकीचा अर्थ लावत असल्याचं केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं हा खुलासा केला आहे
Site Admin | October 12, 2024 7:22 PM | Contraceptive pills
गर्भनिरोधक गोळ्या डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय यापुढेही मिळणार असल्याचं सरकारचं स्पष्टीकरण
