राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ऑकलंड भारतीय समुदायाशी संवाद साधणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आपल्या दोन दिवसीय न्यूझीलंड दौऱ्यात आज ऑकलंड इथं आयोजित एका नागरी स्वागत समारंभात तिथल्या भारतीय समुदायाशी आणि भारताच्या मित्र परिवाराशी संवाद साधणार आहेत. न्यू झीलंडमध्ये ३ लाखाहून अधिक भारतीय राहतात. 

 

दरम्यान, न्यू झीलंड बरोबरचे राजनैतिक  संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत ऑकलंडमध्ये वाणिज्य दूतावास उघडणार असल्याचं राष्ट्रपतींनी काल त्यांच्या सन्मानार्थ आयोजित मेजवानीवेळी बोलताना सांगितलं.