डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 30, 2024 1:22 PM

printer

कृषि पायाभूत सुविधा निधी अंतर्गत देशभरात ७६ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची उभारणी

कृषि पायाभूत सुविधा निधी अंतर्गत देशभरात ७६ हजार कोटी रुपयांचे ७२ हजार पायाभूत सुविधा प्रकल्प उभारण्यात आल्याचं माहिती केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. लोकसभेत पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत बँका आणि वित्तीय संस्थांद्वारे पात्र कर्जदारांना १ लाख कोटी रुपये देण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी योग्य भाव मिळावा यासाठी सरकार साठवणीची योग्य व्यवस्था करत असल्याचं ते म्हणाले. देशाचा कृषी विकास दर सुमारे चार टक्के असून देशात अन्नधान्याचा मुबलक साठा असल्याचं त्यांनी सांगितलं.

उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेचा फायदा सुमारे १७६ सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना झाल्याचं सरकारनं म्हटलं आहे. वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत १ लाख ३२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच या योजनेमुळे साडे ८ लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या असून त्यामुळे ११ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पादन आणि विक्री झाल्याचं त्यांनी सांगितलं.