November 25, 2025 7:34 PM | constitution day

printer

नवी दिल्लीत उद्या संविधान दिनाचा कार्यक्रम होणार

संविधान दिनाच्या निमित्तानं उद्या नवी दिल्लीत संविधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात मुख्य कार्यक्रम होणार आहे. भारतानं १९४९ साली याच दिवशी संविधानाचा स्वीकार केला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला तसंच संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य यात सहभागी होतील. या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नेतृत्वात संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन केलं जाईल. तसंच संविधानाच्या ९ विविध भारतीय भाषांमधल्या प्रतींचं आणि एका विशेष स्मरणिकेचे प्रकाशन होईल. संविधान दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम होणार असून २६/११च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्यांचं स्मरण करण्यात येईल. परभणीत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं परभणीच्या शिवाजी महाविद्यालयात ‘घर घर संविधान’ हा कार्यक्रम उद्या आयोजित केला आहे.