विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा अग्निवीर योजनेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून ही योजना म्हणजे आपल्या वीर जवानांच्या बलिदानाचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. नाशिक मध्ये प्रशिक्षणादरम्यान दोन अग्निवीरांचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या संदर्भात ते बोलत होते. लष्करी सेवेतल्या इतर जवानांप्रमाणे या दोघांच्या कुटुंबांना सरकारकडून नुकसान भरपाई मिळणार का? असा सवाल त्यांनी केला. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.