महायुती सरकारच्या काळात महागाई आणि बेरोजगारीत प्रचंड वाढ-मल्लिकार्जुन खर्गे

महायुती सरकारच्या काळात शेतकरी, कामगार, तरुण, महिला यांचं जगणं कठीण झालं आहे, महागाई आणि बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, अशी टीका करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाविकास आघाडीला विजयी करण्याचं आवाहन केलं. ते वसई इथं प्रचारसभेत बोलत होते. भाजपा समाजामध्ये फूट पाडण्याचं काम करत असून काँग्रेस जोडण्याचं काम करत आहे, असं खर्गे म्हणाले. भाजपा आणि महायुतीने भ्रष्टाचार करून लुटले आहे, महाविकास आघाडी मात्र दिलेली आश्वासनं सत्ता आल्यावर पूर्ण करेल असं खर्गे यांनी सांगितलं.