डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 11, 2024 7:45 PM | Congress | Nana Patole

printer

जातीधर्मात फूट पाडणाऱ्या भाजपा महायुतीला सत्तेतून तडीपार करण्याची पटोलेंची मागणी

भाजपाला विधानसभा निवडणुकीत पराभव दिसू लागल्यानं ते हिंदू-मुस्लीम मुद्दा उपस्थित करत आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातले महाविकास आघडीचे उमेदवार साहेबराव दत्तराव कांबळे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते.  

 

भाजपाचे नेते भाषणात महागाई, बेरोजगारी, शेतकरी यांच्याबद्दल न बोलता ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’, च्या घोषणा देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत, त्याला बळी पडू नका. जातीधर्मात फूट पाडणाऱ्या भाजपा युतीला सत्तेतून तडीपार करा, असं आवाहन पटोले यांनी केलं.