डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मविआ राज्यात सत्तेत आल्यावर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू होणार – नाना पटोले

महाविकास आघाडीचं सरकार राज्यात सत्तेत आल्यावर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. शिर्डी इथं आयोजित  निवृत्तीवेतन राज्य महा अधिवेशनात ते बोलत होते. जुनं निवृत्तीवेतन हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे, असं पटोले म्हणाले.

 

राज्यात अडीच लाख सरकारी पदं रिक्त असून महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर ही पदं भरली जातील असं आश्वासनही त्यांनी दिलं. या अधिवेशनाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार सत्यजित तांबे, अभिजीत वंजारी, रविकांत तुपकर उपस्थित होते.