July 5, 2024 7:19 PM | Rahul Gandhi

printer

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हातरस चेंगराचेंगरीतील पीडितांच्या कुटुंबीयांच्या घेतली भेट

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज हाथरस दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. यातले बहुसंख्य आर्थिक दृष्ट्या दुर्बल असून त्यांना जास्तीत जास्त अर्थसहाय्य मिळावं, अशी मागणी गांधी यांनी राज्यसरकारकडे केली. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने आपला अहवाल आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सादर केला. सुमारे १०० संबंधितांच्या जबान्या नोंदवून हा १५ पानी अहवाल तपास पथकाने तयार केला आहे.