केंद्रसरकारने खासगी शिकवणी वर्गांसाठी नियम करावेत- कन्हैया कुमार

देशात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटना वाढत असून केंद्रसरकारने खासगी शिकवणी वर्गांसाठी नियम करावेत अशी मागणी  काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी केली आहे. नवी दिल्ली इथं आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते. वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रम तसंच स्पर्धा परीक्षांमधे यश मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या खासगी शिकवण्यांचं पेव फुटलं असून सरकारने त्यांच्यावर निर्बंध घातले पाहिजेत असं ते म्हणाले. या वर्गांच्या जाहिरातींना भुलून त्यांची फी भरणारे आणि नंतर अपयश आल्यास निराश होणारे तरुण मोठ्या संख्येनं आहेत. देशात दर २४ तासांत २८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या असल्याचा दावा कन्हैया कुमार यांनी केला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.