लाडकी बहीण योजना फसवी असून मतदारांच्या मतांवर डोळा ठेवून ती सुरु करण्यात आल्याचा काँग्रेसचा आरोप

राज्य सरकारने सुरु केलेली लाडकी बहीण योजना फसवी असून मतदारांच्या मतांवर डोळा ठेवून ती सुरु करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. काँग्रेस पक्षाच्या लातूर, धाराशीव, बीड जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आज लातूरमध्ये झाला त्यावेळी उपस्थित नेत्यांनी हा आरोप केला. या मेळाव्याला काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेशचेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सतेज पाटील, आमदार अमित देशमुख उपस्थित होते. देशात क्रमांक एकचा महाराष्ट्र ११ व्या स्थानावर का घसरला असा सवाल विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.