डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

संसदेच्या लोक लेखा समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल यांची नियुक्ती

लोकलेखा समितीचं आज पुनर्गठन करण्यात आलं. या समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांची नियुक्ती करण्यात आली असून समितीचा कार्यकाळ ३० एप्रिल २०२६ पर्यंत राहील. १९६७ पासून सुरु झालेली ही  लोकलेखा समिती नियंत्रक आणि महालेखापालांच्या आहवालांचं परीक्षण करते. तसंच सरकारी योजना आणि खर्चाचा अभ्यास करते.