डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 15, 2024 3:29 PM | Congress

printer

अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या वरिष्ठ निरीक्षक आणि निवडणूक समन्वयकांची नेमणूक

विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसनं आज अखिल भारतीय काँग्रेस समितीचे वरिष्ठ निरीक्षक आणि वरिष्ठ निवडणूक समन्वयकांची नेमणूक केली आहे. मुंबई आणि कोकण विभागाचे निरीक्षक म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत आणि डॉ. जी. परमेश्वर काम पाहतील. विदर्भासाठी भूपेश बघेल, चरणजीत सिंह चन्नी आणि उमंग सिंघर, तर मराठवाड्यात सचिन पायलट आणि उत्तम कुमार रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात टी. एस. सिंगदेव आणि एम. बी. पाटील, तर उत्तर महाराष्ट्रासाठी सईद नसीर हुसेन आणि डॉ. अनसुया सीताक्का यांच्याकडे निरीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आल्याचं काँग्रेसनं पत्रकाद्वारे जाहीर केलं आहे.