डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट

राज्यातली ढासळती कायदा आणि सुव्यवस्था, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान आदी मागण्या घेऊन काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा शिष्टमंडळात समावेश होता. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात केलेलं चिथावणीखोर वक्तव्य, मालवणमधला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणं या मुद्दांकडे काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांचं लक्ष वेधलं. राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून विधानसभा निवडणूक निर्भय वातावरणात होण्याबाबत काँग्रेस नेत्यांनी शंका व्यक्त केली. काँग्रेस नेत्यांच्या मागण्या ऐकून घेत सर्व प्रकरणात आपण स्वतः लक्ष देऊ असं आश्वासन राज्यपालांनी दिलं आहे. तसंच राहुल गांधी यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी गृह विभागाकडून माहिती घेऊन कडक कारवाई करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. 

मराठवाडा आणि विदर्भातल्या सहा लाख हेक्टरवरल्या पिकांचं नुकसान अतिवृष्टीमुळे झालं. राज्यात केंद्रीय पथक अजूनही पााहणी करायला आलं नसल्याची तक्रार काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांना केली.