पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरुन तात्काळ हटवण्याची काँग्रेसची मागणी

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरुन तात्काळ  हटवावं अशी विनंती प्रदेश काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे केली आहे. रश्मी शुक्ला यांची सेवानिवृत्ती ३० जून २०२४ ला होणार असताना त्यांना बेकायदेशीररित्या जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे, विरोधी पक्षनेत्यांचे दूरध्वनी बेकायदेशीररित्या टॅप करण्याच्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप आहेत, त्यांची कार्यक्षमता आणि निःपक्षपातीपणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत, या पार्श्वभूमीवर राज्यात विधानसभेच्या आगामी निवडणुका मुक्त वातावरणात पार पडण्याच्या दृष्टीनं, त्यांना पदावरुन हटवावं, असं प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्य निवडणूक आय़ुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.  

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.