October 21, 2024 8:19 PM | Congress

printer

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची नवी दिल्लीत बैठक

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज नवी दिल्लीत झाली. यावेळी महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांविषयी चर्चा झाली. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल यांच्यासह राज्यातले नेते उपस्थित होते. २५ तारखेला छाननी समितीची आणखी एक बैठक होईल, त्याच दिवशी अंतिम निर्णय होईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीनंतर दिली.