बिहार विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतला जागावाटपाचा तिढा तेजस्वी यादव यांनी सोडवावा असं आवाहन काँग्रेसनं केलं आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपली. मात्र इंडिया आघाडीचं जागावाटपाचं सूत्र जाहीर झालं नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात अनेक मतदारसंघात काँग्रेस, राजद आणि डाव्या पक्षांचे उमेदवार एकमेकांविरोधात लढत आहेत. दुसऱ्या टप्प्यातल्या जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या संपत आहे. या टप्प्यातल्या कुटुंब मतदारसंघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजेश राम यांच्याविरोधात उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय राजदने घेतल्यामुळे संबंध अधिकच ताणले गेले आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षानेही अनेक ठिकाणी काँग्रेसविरोधात उमेदवार उभे केले असून झारखंड मुक्ती मोर्चाने सहा ठिकाणी इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांच्या उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Site Admin | October 19, 2025 3:04 PM | Election | tejasvi yadav
इंडिया आघाडीतला जागावाटपाचा तिढा तेजस्वी यादव यांनी सोडवावा असं काँग्रेसचं आवाहन