December 28, 2025 2:34 PM | Congress | Maharashtra

printer

देशाला आज काँग्रेस विचाराची गरज – हर्षवर्धन सपकाळ

देशाला आज काँग्रेस विचाराची गरज असल्याचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १४० व्या स्थापना दिनानिमित्त आज मुंबईत टिळक भवन इथल्या पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रर्मात ते बोलत होते.

 

देशात आज जात, धर्म, भाषा आणि पंथावरून समाजा समाजात विभाजन केलं जात असून, सत्ताधारी सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम करत असल्याची टीका त्यांनी केली. अशा परिस्थितीत काँग्रेसचा विचारच देशाला तारणारा विचार असल्याचं ते म्हणाले. राजसत्ता आणि धर्मसत्ता मूठभर लोकांच्याच हातात असावी असा भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार आहे, मात्र सत्ता, संपत्तीवर सर्वांचा अधिकार आहे हा काँग्रेस पक्षाचा विचार आहे असं त्यांनी सांगितलं. 

 

मनरेगातील महात्मा गांधींचं नाव कायम ठेवण्यासाठी आणि कामगारांच्या हक्कासाठी काँग्रेस वचनबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं, तसंच कार्यकर्त्यांना मनरेगा बचावची शपथही दिली गेली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.