November 8, 2025 7:03 PM | Congress

printer

राज्यातल्या जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढून हिवाळी अधिवेशनात चर्चा करण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्यभरात कोट्यवधी रुपयांचे भूखंड कवडीमोल भावाने लाटले जात असून या सर्व जमीन व्यवहाराची श्वेतपत्रिका काढावी आणि हिवाळी अधिवेशनात त्यावर चर्चा करावी अशी मागणी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. मुंबईत टिळक भवन इथं ते आज वार्ताहर परिषदेत बोलत होते. पुण्यात कोरेगाव पार्क इथल्या जमीन व्यवहारावरून त्यांनी सरकारवर टीका केली. हा गैरव्यवहार उघड झाल्यावर तो रद्द करण्यात आला, मात्र दोषींवर काहीही कारवाई केली नाही अशी टीका सपकाळ यांनी केली. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.