काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक आज गुजरातमध्ये अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय स्मारकात होत आहे. अखिल भारतीय काँग्रेसचं अधिवेशन उद्या साबरमती नदीच्या काठावर होणार आहे. काँग्रेसचे माध्यम आणि प्रसार विभागाचे अध्यक्ष पवन खेडा यांनी काल ही माहिती दिली. देशभरातून या अधिवेशनाला ३ हजार प्रतिनिधींसह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत.
Site Admin | April 8, 2025 1:41 PM | Congress
गुजरातमध्ये काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक
 
		 
									 
									 
									 
									 
									