डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 16, 2024 8:34 PM | ECI

printer

पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या पथकानं विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत मुद्देमाल जप्त

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या पथकानं विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत अवैध रोकड, सोनं, चांदी आणि दारू यासारखा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

मुंबईतल्या वाशी चेकनाक्यावर आज एका ट्रकमधून सुमारे साडे आठ हजार  किलो चांदी जप्त केली. या चांदीचं  बाजारमूल्य अंदाजे ८० कोटी रुपये इतकं आहे. नागपूर मधे मुंबईहून आलेल्या पार्सलमधून सुमारे १ कोटी ६३ लाख रुपयांचे सोनं, चांदी आणि  हिऱ्याचे दागिने आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक केली. 

 

जळगाव जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत ४ कोटी २० लाख रुपयांची रोकड, दारू, अंमली पदार्थ आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.