भाजप शासित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची एक दिवसीय परिषद आज दिल्लीत झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद झाली. भाजपच्या सुशासन विभागानं आयोजित केलेल्या या बैठकीत सुशासनाच्या मुद्द्यांबाबत चर्चा झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा म्हणाले की, या परिषदेत दोन ठराव मंजूर करण्यात आले आहेत. यावेळी ऑपरेशन सिंदूरच्या यशासाठी भारतीय संरक्षण दल आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे अभिनंदन करण्यात आले. तर केंद्र सरकारच्या जात गणना करण्याच्या निर्णयाबद्दल ही अभिनंदन करण्यात आलं. गेल्या वर्षी ९ जून रोजी स्थापन झालेल्या भाजपा सरकारच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दशकाची पूर्तता आणि २५ जून रोजी आणीबाणी लागू करण्याच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त आगामी कार्यक्रमांवर देखील चर्चा करण्यात आली. भाजपाशासित सर्व २० राज्यांचे २० मुख्यमंत्री आणि १८ उपमुख्यमंत्री या परिषदेत सहभागी झाले होते. या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते.
Site Admin | May 25, 2025 7:56 PM
नवी दिल्लीत भाजपा शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची परिषद
