संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेत सहभाग असलेल्या देशांच्या प्रमुखांची परिषद १४ ऑक्टोबरपासून नवी दिल्लीत सुरू होणार असून भारतीय लष्कर या परिषदेच्या यजमानपदी आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर, शांती मोहिमांसाठीचे उपमहासचिव झाँ-पीएर लाक्र्वा यांच्यासह इतर मान्यवर या परिषदेत विविध सत्रांना संबोधित करतील. संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ३२ देशांचे प्रतिनिधी या तीन दिवसीय परिषदेत सहभागी होतील. संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमांमध्ये सर्वाधिक योगदान देणाऱ्या देशांपैकी भारत एक असल्याचं संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे.
Site Admin | October 12, 2025 8:12 PM | Conference
नवी दिल्लीत संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेत सहभाग असलेल्या देशांच्या प्रमुखांची परिषद
