नांदेड इथं आयोजित विसाव्या समरसता साहित्य संमेलनाचा आज समारोप होणार आहे. काल ग्रंथदिंडीने या संमेलनाला सुरूवात झाली. संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेव कांबळे, यांनी यावेळी केलेल्या भाषणात, समरसतेवर आधारित जीवनमूल्यांशी बांधिलकी मानणारी समाजनिष्ठ साहित्य निर्मिती ही काळाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं.
यावेळी पद्मश्री गिरीश प्रभुणे, पद्मश्री भिकुजी दादा इदाते, प्राध्यापक रमेश पांडव, पूर्व संमेलन अध्यक्ष प्राध्यापक शेषराव मोरे, गोविंद नांदेडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या दोन दिवसीय संमेलनात मुलाखती, परिसंवाद, कवी संमेलनं, चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.