दुचाकी वाहनांची संपूर्ण पथकर मुक्ती सुरू राहील, असं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. दुचाकींवर पथकर लादण्यात येणार असल्याचा कोणताही निर्णय प्रस्तावित नसून काही प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात प्रसारित केलेलं वृत्त दिशाभूल करणारं असल्याचं त्यांनी सांगितलं.