मध्यप्रदेशात आजपासून १९ शहरी आणि ग्रामीण भागांत संपूर्ण दारुबंदी लागू

मध्य प्रदेशात, उज्जैन, ओंकारेश्वर, महेश्वर आणि मैहर यासारख्या निवडक ग्रामपंचायतींअंतर्गत येणाऱ्या ठिकाणांसह १९ धार्मिक शहरांमध्ये तसंच इतर परिसरांत आजपासून दारूबंदी लागू होत आहे. उज्जैन, ओंकारेश्वर, महेश्वर, मंडलेश्वर, ओरछा, मैहर, चित्रकूट, दतिया, पन्ना, मंडला, मुलताई, मंदसौर आणि अमरकंटक या शहरी हद्दीतील सर्व दारूची दुकाने आणि बार बंद करण्यात आल्याची माहिती एका सरकारी अधिकाऱ्यांनी दिली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.