भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला कालपासून नाशिक इथं प्रारंभ झाला. कम्युनिस्ट पक्षाचा लढा प्रस्थापित सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या विरोधात कायम राहील, असं यावेळी अधिवेशनाचे अध्यक्ष भालचंद्र कांगो यांनी म्हटलं आहे. तर देशातील दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक यांचे लढे एकमेकांशी जोडले गेले आहेत, म्हणून नव्या पद्धतीने पक्ष बांधण्याची गरज आहे, असं भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या अमरजीत कौर यांनी म्हटलं आहे.
Site Admin | June 23, 2025 3:36 PM | Communist Party of India | Nashik
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला प्रारंभ
