November 12, 2024 8:30 PM

printer

ग्राहकांना येणाऱ्या समस्यांवर दूरसंचार मंत्रालयाचं लक्ष

मोबाइल कॉल न लागणं, बोलता बोलता कॉल बंद होणं यासारख्या ग्राहकांना येणाऱ्या समस्यांवर दूरसंचार मंत्रालय लक्ष ठेवून आहे. यासंदर्भातल्या निकषांचं उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांना दंड ठोठावण्याचा मंत्रालयाचा विचार आहे. सध्या वर्षातून चार वेळा ऐवजी दर महिन्याला कॉल्सच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवलं जातं आहे.