अहमदाबादमध्ये १००वी राष्ट्रकुल स्पर्धा २०३० मध्ये होणार

१००वी राष्ट्रकुल स्पर्धा २०३० मध्ये गुजरातच्या अहमदाबाद इथं होणार आहेत. राष्ट्रकुल संघटनेनं आज ग्लासगो इथं औपचारिकरीत्या आयोजनाचे अधिकार भारताकडे सोपवले. यात ७४ देशातले खेळाडू सहभागी होतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयोजनाची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. जगभरातल्या खेळाडूंचं स्वागत करण्यासाठी इच्छुक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

 

राष्ट्रकुल स्पर्धांचं यजमानपद भूषवण्याची भारताची ही दुसरी वेळ आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.