राष्ट्रकूल स्पर्धांमधून ‘या’ खेळांना वगळलं

आगामी राष्ट्रकूल स्पर्धांमधून हॉकी, क्रिकेट, कुस्ती, बॅडमिंटन, स्क्वॅश आणि टेबल टेनिस सह अनेक खेळ वगळण्यात आले आहेत. यातल्या बहुतांश खेळांमध्ये भारताची पदकं निश्चित असतात. स्कॉटलंडमधल्या ग्लासगो शहरात २०२६ मध्ये होणाऱ्या या स्पर्धांमध्ये केवळ १० खेळांचा समावेश असणार आहे. त्यात अॅथलेटिक्स, जलतरण, आर्टिस्टिक जिम्नस्टॅिक, सायकलिंग, नेट बॉल, भारोत्तोलन, मुष्टीयुद्ध, ज्युदो, बाऊल्स, बास्केटबॉल यांचा समावेश आहे. यातल्या काही खेळांमध्ये दिव्यांग खेळाडूही सहभागी होणार आहेत.