डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

व्यावसायिक गॅस सिलिंडर २४ रुपयांनी स्वस्त

देशातल्या १९ किलोच्या व्यावसायिक  गॅस सिलिंडरच्या किंमती २४ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय तेल विपणन कंपन्यांनी घेतला आहे. आता व्यावसायिक सिलिंडर दिल्लीत १ हजार ७२३ रुपयांना, मुंबईत १ हजार ६७४ रुपये, कोलकाता १ हजार ८२६, चेन्नईत १ हजार ८८१, बंगळुरूत १ हजार ७९६, नोएडा १ हजार ७२३ आणि चंडीगडमधे १ हजार ७४३ रुपयांना मिळेल. याआधी मे महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती १४ रुपयांनी कमी झाल्या होत्या.