वाणिज्य मंत्री पियूष गोयल आज दोन दिवसांच्या यूनायटेड किंग्डमच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. भारत आणि यूके यांच्या दरम्यान मुक्त व्यापार करार पूर्ण करण्याच्या दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांनी केलेल्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. वाणिज्य मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, या दौऱ्यात पियूष गोयल हे ब्रिटनचे व्यवसाय आणि व्यापार मंत्री जोनाथन रेनॉल्ड्स यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतील.
या बैठकीत मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींमध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात येईल. तसंच, या कराराचा अंतिम मसुदा तसंच त्याच्या अंमलबजावणीसाठी एक स्पष्ट आणि कालबद्ध धोरणही तयार करण्यातद येईल. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये आर्थिक प्राधान्य, सहकार्य आणि गुंतवणूक सुलभीकरणावर चर्चा करण्यासाठी गोयल हे ब्रिटनच्या अर्थमंत्री रॅशेल रीव्हज यांची भेट घेतील.
Site Admin | June 18, 2025 2:33 PM | यूनायटेड किंग्डम | वाणिज्य मंत्री पियूष गोयल
वाणिज्य मंत्री पियूष गोयल आज दोन दिवसांच्या यूनायटेड किंग्डमच्या दौऱ्यासाठी रवाना
