डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महायुुतीचं सरकार आल्यानंतर राज्यातली प्रशासन व्यवस्था कोलमडली – मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

काँग्रेसनं कायमच लोकशाही आणि संविधान यांचं रक्षण आणि संवर्धन केलं आहे, असं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अमरावती इथं प्रचारसभेत सांगितलं. विचारावर, तत्वावर, कामावर टीका करावी व्यक्तिगत टीका करु नये, असंही ते म्हणाले. 

नरेंद्र मोदींनी खोटी आश्वासनं दिली, शेतकऱ्यांना हमीभाव, महिलांना सुरक्षितता, तरुणांना रोजगार काहीही मिळालं नाही असा आरोप खर्गे यांनी केला. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर शेतकरी, महिला, युवा यांच्यासाठी कल्याणकारी योजना आणू, असं आश्वासन खर्गे यांनी दिलं. 

बाईट – खर्गे

त्याआधी मल्लिकार्जुन खर्गे यांनी नागपूर इथं वार्ताहरांशी संवाद साधला. न्याय, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची प्रशासन व्यवस्था महायुुतीचं सरकार आल्यानंतर कोलमडली आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. महाराष्ट्राला पुन्हा एकदा प्रगतीपथावर आणण्यासाठी ही निवडणूक महत्वाची असल्याचं खर्गे म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.