डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 25, 2025 3:07 PM | Kunal Kamara

printer

कुणाल कामराची माफी मागायला नकार

माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत सादर करणारा हास्य कलाकार कुणाल कामरा यानं माफी मागायला नकार दिला आहे. आपल्या कार्यक्रम स्थळाची शिंदे यांच्या समर्थकांकडून केलेल्या तोडफोडीचाही त्याने निषेध केला. कुणाल कामरानं एका लोकप्रिय हिंदी गाण्याच्या चालीवर एकनाथ शिंदे आणि शिवसेना फुटीच्या संदर्भात टिप्पणी केली होती. हे गाणे व्हायरल झाल्यानंतर शिंदे यांच्या समर्थकांनी त्याच्या स्टुडिओत तोडफोड केली होती. त्याने केलेल्या टिप्पणीवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नंतर तो खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.