पंजाब आणि मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट !

पंजाब आणि मध्य महाराष्ट्रात आज थंडीची लाटयेण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. तर केरळ,तामिळनाडू,पुडूचेरी आणि काराईकलच्या काही भागात आज सोसाट्याचे वारे, ढगांच्या गडगडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. आसाम, मेघालय, हिमाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा आणि ओडिशामधील काही ठिकाणी आज दाट धुक्याची परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता अजूनही अत्यंत निकृष्ट श्रेणीत असल्याचं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं म्हटलं आहे.