डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

यूएस ओपनमध्ये कोको गोफची अटीतटीची विजयी झुंज: सिनर, ओसाका, श्वियांतेक दुसऱ्या फेरीत

यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत माजी विजेती कोको गोफ हिला आयला ताम्यानोविच हिच्याविरुद्ध कडवी झुंज द्यावी लागली. तिसऱ्या, निर्णायक सेटपर्यंत रंगलेल्या या अटीतटीच्या सामन्यात कोको हिनं ६-४, ६-७, ७-५ असा विजय मिळवला. तर पुरुष एकेरीत टॉमी पॉल यानं एल्मर मोलर याच्यावर ६-३, ६-३, ६-१ अशी, तर अलेक्झांडर झ्वेरेव्ह यानं अलेजँद्रो ताबिलो याच्यावर ६-२, ७-६, ६-४ अशी सहज मात केली.

 

इतर सामन्यांमध्ये अग्रमानांकित यानिक सिनर, इगा श्वियांतेक आणि नाओमी ओसाका यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना थेट सेट्समध्ये हरवून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.