September 26, 2025 2:34 PM | COAL INDIA LIMITED

printer

कोळसा मंत्रालयाच्या अंतर्गत बिगर कार्यकारी कर्मचाऱ्यांना ‘परफॉर्मन्स लिंक्ड अवॉर्ड्’ जाहीर

कोळसा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कोळसा सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांनी आज त्यांच्या बिगर कार्यकारी कर्मचाऱ्यांना ‘परफॉर्मन्स लिंक्ड अवॉर्ड्’ जाहीर केलं आहे. एक लाख तीन हजार रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरुप असून कोल इंडिया लिमिटेड आणि त्यांच्या उपकंपन्यांमधल्या सुमारे दोन लाखांहून अधिक बिगर कार्यकारी कर्मचाऱ्यांना या पुरस्काराचा लाभ होईल, असं मंत्र्यालयानं स्पष्ट केलं आहे. सीआयएलच्या उपकंपन्या आणि एससीसीएल मधल्या बिगर कार्यकारी कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल घेणं, त्यांना सणाच्या काळात दिलासा देणं हा पुरस्कार देण्यामागचा प्रमुख उद्देश असून कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती नुसार त्यांना ही रक्कम देण्यात येईल, असं कोळसा मंत्रालयानं म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.