शेअर बाजाराच्या धर्तीवर कोळशाच्या व्यवहारासाठी वेगळा मंच सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय कोळसा मंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज मुंबईत दिली. कोळसा मंत्रालयाच्या स्टार रेटिंग पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.या मंचाच्या स्थापनेला संसदेची मान्यता मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं. या मंचाच्या माध्यमातून देशातल्या खरेदीदारांच्या गरजा पूर्ण केल्या जातील असं ते म्हणाले. गेल्या काही वर्षात कोळसा क्षेत्रात सातत्याने सुधारणा होत आहेत. कोळसा खाणींच्या लिलावातून खासगी क्षेत्रातल्या अधिकाधिक कंपन्या या क्षेत्रात येत आहेत. कोळसा उत्खननातील खासगी क्षेत्राची हिस्सेदारी ५० टक्के पर्यंत वाढावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. येत्या काळात कोळशाची मागणी वाढणार असल्याने कोळसा क्षेत्रातल्या कंपन्यांनी नवनवतीन तंत्रज्ञान विकसित करावे. त्याचवेळी विविध घटकांना ध्यानात घेऊन काळजीपूर्वक खाणकाम करावं असं आवाहन रेड्डी यांनी केलं. यावेळी कोळसा आणि खाणकाम क्षेत्रातल्या विविध कंपन्यांना आणि संस्थांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कोळसा नियंत्रकांच्या नव्या वेबसाईटचे अनावरण सुद्धा त्यांनी केले.
Site Admin | September 4, 2025 1:20 PM
कोळशाच्या व्यवहारासाठी शेअर बाजाराच्या धर्तीवर वेगळा मंच सुरू होणार
