डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विधानसभा निवडणुकीत विक्रमी यश मिळवू, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं आपली ताकद दाखवून दिली असून, विधानसभा निवडणुकीत विक्रमी यश मिळवू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं आयोजित प्रचारसभेत बोलत होते. 

 

काँग्रेसच्या पायाशी गहाण ठेवलेला धनुष्यबाण सोडवण्यासाठी आम्हाला उठाव करून सत्ताबदल करावा लागला, असं ते म्हणाले. लाडकी बहीण पुढचा हप्ता निवडणूक झाल्यावर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं. 

 

जालना जिल्ह्यात घनसावंगी इथंही त्यांनी आज प्रचारसभा घेतली.  मराठवाडा आणि दुष्काळ हे समिकरण आपल्याला हद्दपार करायचं असून, विकासाच्या माध्यमातून मराठवाड्याला न्याय द्यायचा आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.