‘महायुती सत्तेत आल्यानंतरच राज्य प्रगतीपथावर पुढं गेलं, यानंतरही पुढंच नेऊ’

महायुतीचं सरकार आल्यानंतरच राज्य प्रगतीच्या मार्गावर पुढे गेलं असून, यापुढंही आपण ते पुढंच नेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुळ्यात साक्री इथं झालेल्या प्रचारसभेत दिलं. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी आपण केंद्र सरकारची मदत घेतली. त्यानंतर सोयाबीनला प्रतिक्विंटल ४ हजार ८९२ रुपये किंमत देण्याचा निर्णय केंद्र शासनानं घेतल्याचं शिंदे यावेळी म्हणाले. 

 

नंदुरबार जिल्ह्यात धडगाव इथंही त्यांनी आज प्रचारसभा घेतली. आचार संहिता संपल्यानंतर मोलगी तालुक्याची निर्मिती करण्याचं आश्वासन शिंदे यांनी या सभेत दिलं. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.