डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 11, 2024 7:10 PM | CM Eknath Shinde

printer

सिडकोच्या आणि नवी मुंबई पालिकेच्या विविध नागरी सुविधा, प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

 सिडकोच्या आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या  विविध नागरी सुविधा, प्रकल्पांचं लोकार्पण अणि महाराष्ट्र भवनाचं भूमिपूजन ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज वाशी इथल्या सिडको प्रदर्शन केंद्रात झालं. राज्यभरात असलेल्या सिडकोच्या मालकीच्या जमीनी मोकळ्या करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करताना काही अडचणी येत असतील तर त्या दूर करण्याचा आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

 

पनवेल महापालिकेचा शास्ती कर रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं तसंच महापालिकेच्या परिवहन सेवेत महिलांना ५० टक्के सवलत देण्याचा निर्णयही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी जाहीर केला. याच कार्यक्रमात ईर्शाळवाडी दुर्घटनेत घर गमावलेल्या काही ग्रामस्थांना प्रातिनिधीक स्वरूपात घराची किल्ली देण्यात आली. तर १३ ग्रामस्थांना सिडकोमध्ये कंत्राटी पद्धतीनं काम करण्यासाठी पत्र देण्यात आली.