डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुलडाणा जिल्ह्यातल्या वेद विद्यालयाच्या नव्या वास्तूचं भूमिपूजन

बुलडाणातल्या खामगाव इथल्या महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान अंतर्गत जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नव्या वास्तुचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वेद विद्यालयाच्या नव्या वास्तूचं भूमिपूजन करून कोनशिलेचं अनावरण केलं. त्यानंतर त्यांनी वारकरी संप्रदायाशी संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमीचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.